होमपेज › Marathwada › 'वंशाच्या दिव्या'साठी शिक्षकाने केले दुसरे लग्‍न

'वंशाच्या दिव्या'साठी शिक्षकाने केले दुसरे लग्‍न

Published On: Apr 22 2018 9:12AM | Last Updated: Apr 22 2018 9:12AMउस्मानाबाद : प्रतिनिधी

वंशाला दिवा  हवा या अट्टहासाने तेरखेडा (ता. वाशी) येथील एका शिक्षकाने पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसरे लग्‍न केले. केवळ आई-वडिलांच्या आग्रहामुळे लग्‍न करावे लागलेल्या दुसर्‍या पत्नीने पोलिस ठाणे गाठले. पुण्यात गुन्हाही दाखल झाला. आता अधिक तपासासाठी पुण्याचे पोलिस गावात दाखल झाले आहेत.

तेरखेडा येथील सधन कुटुंबातील एका जिल्हा परिषद शिक्षकाला 14 वर्षे वयाची मुलगीही आहे. तरीही त्याला वंशाला दिवा नसल्याने दुसरे लग्‍न करावयाचे होते. त्यासाठी त्याने घरातील सर्वांची सहमती घेऊन पुण्यातील एक स्थळ शोधून काढले. या 46 वर्षीय शिक्षकाला 19 वर्षीय नववधू पसंत पडली. तिच्या आईवडिलांना पुण्यात फ्लॅट देण्याबरोबर कर्ज फेडण्याचेही आमिष त्याने दाखवले. ते त्याला बळीही पडले. त्या मुलीलाही शिक्षकाने आपले वय 36 सांगितले अशी चर्चा आहे. 

दरम्यान, हे लग्‍न आळंदीत झाले तेही दुसर्‍या नववधूच्या इच्छेविरुध्दच. सासरी म्हणजे तेरखेडा येथे आल्यानंतर या मुलीची घुसमट होऊ लागली त्यातूनच तिने येथून सुटका करुन घेतली. हा प्रकार पुढे येरमाळा पोलिस ठाण्यात गेला. लग्‍न आळंदीत झाले असल्याने अखेर आता पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात हे प्रकरण आहे. आता पुण्याचे पोलिस तपासासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शिक्षण क्षेत्राऐवजी वंशाच्या दिव्यासाठी ‘उत्तम’ कामगिरी करण्याचा प्रकार म्हणजे शिक्षकी पेशालाही ‘काळे’ फासण्यासारखा आहे. पोलिस त्याची कशी दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार

Tags : Wife,Teacher Second Marriage, 19 Years Old Girl, Osmanabad,Gender Determination Case, Pune