Tue, Jul 23, 2019 11:29होमपेज › Marathwada › अधिकमासात दानासाठी तांब्याच्या भांड्यांना मागणी

अधिकमासात दानासाठी तांब्याच्या भांड्यांना मागणी

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:32PMपूर्णा : प्रतिनिधी

आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तांब्याच्या धातूचे अधिकमासात दान करण्याची परंपरा असल्याने बाजारात वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात दिव्यापासून मोठ्या घंगाळापर्यंतच्या वस्तू आपल्या ऐपतीप्रमाणे दान केल्या जात आहेत. 

अधिक महिना सुरू झाल्याने पुजेच्या साहित्य विक्रीची दुकाने तसेच भांड्याची दुकाने आदी ठिकाणी तांब्यांच्या वस्तू बाहेरच मांडून ठेवल्या आहेत. चमकणार्‍या या वस्तू येणार्‍या - जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. दुकानदारांनी त्या वस्तूंची मांडणी आकर्षक पध्दतीने केलेली दिसून येते. यात तांब्याच्या पत्र्याचा दीप, निरांजन, पंचपात्र, त्याच्या लहान मोठ्या आकाराच्या ताटल्या व डिश आदी वस्तूंचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना पूजा साहित्य विक्रेते गोविंद चौधरी  म्हणाले की, तांब्याच्या दीपदानाला महत्त्व असल्याने तांब्याच्या दिव्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. 

काही महिला मंदिरात महिनाभर तांब्याचे दिवे लावतात तर काही नदीत सोडतात. शास्त्र म्हणून काहीजण अनारसे किंवा बत्तासे दान देताना तांब्याच्या प्लेटमध्ये ठेऊन त्यावर एक दिवा लाऊन देतात. त्यामुळे या वस्तूंची विक्री होते. तसेच आपापल्या ऐपतीप्रमाणे महिला तांब्याच्या लहान - मोठ्या वस्तू खरेदी करतात, असे भांड्याचे व्यापारी उमेश झरकर यांनी सांगितले.

सत्पात्री दान महत्त्वाचे ः तांब्याच्या वस्तू मानवी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात. हा धातू दैनंदिन जीवनात वापरात यावा यासाठी त्याला शास्त्रकत्यार्र्ंनी  धार्मिक आधार दिला असावा अर्थात दान सत्पात्री असावे हेही महत्त्वाचे आहे.   -अरुणगुरु खांडवीकर 

गंगेस धोंडे अर्पण करतात ः धिकमासानिमित्त  गंगा स्नान व गंगा पूजनास महत्त्व आहे. गंगेस धोंडे अर्पण करण्यात येतात. पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगाजी बापू, धनगर टाकळी व कंठेश्वर आदी धार्मिक स्थळी भाविक भक्तांची यासाठी गर्दी आहे.