Tue, Apr 23, 2019 18:20होमपेज › Marathwada › अतिरिक्‍त निधीबाबत आश्‍वासनावर बोळवण

अतिरिक्‍त निधीबाबत आश्‍वासनावर बोळवण

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:35AMपरभणी : प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यात विविध विकास योजना राबविण्यासाठी 142 कोटींची अतिरिक्‍त मागणी नियोजन समितीच्या आढावा बैठकीत करण्यात आली. हा निधी मिळाल्यास पाटबंधारे, शाळा, पोलिस, रस्ते विकास कामांना गती येणार आहे, परंतु बैठकीत अर्थमंत्र्यांनी केवळ आश्‍वासनावरच बोळवण केली.

जिल्हा वार्षिक योजना 2018-19 मराठवाडा विभाग राज्यस्तरीय आढावा बैठक वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे सोमवारी झाली. परभणीच्या बैठकीस परभणीचे पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर,समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आमदार डॉ राहुल पाटील, नियोजन विभागाचे अप्पर सचिव चक्रवर्ती, विभागीय आयकुत डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार व सदस्य आदींची उपस्थिती होती.2018-19 साठी जिल्हा नियोजन समितीने सर्वसाधारण योजनेचा 144 कोटीचा आराखडा मंजूर केला, असून अतिरिक्त मागणी 142 कोटींची आहे. या अतिरिक्त मागणीमध्ये कोल्हापूर पाटबंधारे, सीएनबी, शाळा दुरुस्ती, पोलिस विभागासाठी सीसीटीव्ही,आरोग्य केंद्राची देखभाल दुरुस्ती, शौचालय बांधकाम, ग्रामीण रस्ते, जिल्हा विकास, साईबाबा जन्मस्थान तीर्थक्षेत्र विकास या व इतर विविध योजनांकरिता एकूण 142 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली. यावेळी नाट्यगृह बांधकामासाठी वाढीव 6 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून मुनगंटीवार यांनी वाढीव निधी मागणी लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.