Tue, Apr 23, 2019 08:26होमपेज › Marathwada › अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आज परभणीत

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आज परभणीत

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 11:58PMपरभणी : प्रतिनिधी

10, 12 तसेच जेईई, सीईटीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन मेळावा 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात शिवसेनेकडून आयोजित करण्यात आला आहे. 

परभणी विधानसभा मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धर्मवीर राजे संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, औरंगाबाद येथील शिक्षणतज्ञ प्रा. रवींद्र बनसोड यांची उपस्थिती राहणार आहे. 10 वी परीक्षेत 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण, 12 वीत तिन्ही शाखांमधून 80 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण तसेच नीट परीक्षेत 400 पेक्षा जास्त आणि सीर्ईटी परीक्षेत 120 पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह अपंग, मूकबधीर, गुणवंतांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी गुणवंतांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन आ.डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.