Mon, Jan 21, 2019 23:58होमपेज › Marathwada › सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांवर कारवाई  

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांवर कारवाई  

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:40AMबीड : प्रतिनिधी  

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो.  कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धूम्रपान करणे कायद्याने गुन्हाच आहे. तेव्हा अशा लोकांवर अंकुश ठेवण्यासही सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई  केली जाणार असून त्याचे खास प्रशिक्षण ही पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती  पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.  

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी  कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, संबंध हेल्थ फाउंडेशन व्यवस्थापक देविदास शिंदे, समन्व्य श्रीकांत जाधव, नोडल ऑफिसर रामचंद्र आमटे आदी उपस्थित होते.  या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीकरिता देशात कार्यरत असलेल्या संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे बीड पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. कोटपा कायद्यानुसार कोणाकोणावर कारवाई करणे शक्य आहे, शाळा परिसरात तंबाखू- सिगारेट विकणार्‍यांवर कशा प्रकारे कारवाई करता येईल अशा अनके प्रश्नांवर चर्चा या कार्यशाळेत करण्यात आली.  यावेळी बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, शिवाजीनगर, गेवराई, तलवाडा, चकलांबा, माजलगाव, सिरसाळा, वडवणी, केज, आष्टी, शिरूर, अंबोरा आदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक उपस्थित होते. 

Tags : Marathwada, Action, smokers ,public, places