बीड : परळीत दारु अड्ड्यावर छापा

Last Updated: Apr 10 2020 3:57PM
Responsive image


अंबाजोगाई : प्रतिनिधी 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास परळी येथील आंबेडकर नगरमधील दारू अड्ड्यावर छापा टाकून दोन लाख चार हजार चारशे तीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अकोल्यात टेन्शन वाढलं; नवे ४ जण पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या १३ वर

सध्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने दि. १४ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा काही समाजकंटक त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट मद्य तयार करून त्याची विक्री करीत  आहेत. याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी परळीतील आंबेडकर नगर या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत एका खोलीतून बनावट दारू तयार करण्याकरिता लागणारे स्पिरिट ७०० लिटर, तयार ब्लेंड ५ लिटर, १ सिलिंग मशीन, ६०० रिकाम्या बाटल्या, बाटलीवर चिकटवण्याकरिता लागणारी १०० लेबल, १८० मिली क्षमतेच्या ४८ तर १८९ मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. 

वाशिममध्ये पोलिसांकडून १७६ वाहने जप्त

या ठिकाणाहून आरोपी सिद्धार्थ भगवान देवडे (वय ३२,रा.आंबेडकर नगर, परळी) हा फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी एकूण रुपये दोन लाख चार हजार ४३० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ए.एम. पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

परभणीत १९२ संशयितांचे नमुने निगेटिव्ह

नागरिकांनी अशा बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी न पडता अशा बनावट मद्याची खरेदी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. तसेच त्यांच्या परिसरात अवैध बनावट दारूची विक्री होत असल्यास किंवा हातभट्टी दारू तयार होत असल्यास त्याची माहिती असल्यास ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ यावर देण्यात यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच सर्व मद्यविक्री धारकांनाही चोरी छुप्या पद्धतीने त्यांच्या मद्याची विक्री करु नये, असे आढळून आल्यास संबंधित मद्यविक्री धारका विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

नांदेड : बार फोडून लाखांची विदेशी दारू लंपास!