Tue, Nov 13, 2018 23:40होमपेज › Marathwada › जिल्हाधिकार्‍यांची गोदापात्रात धडक कारवाई

जिल्हाधिकार्‍यांची गोदापात्रात धडक कारवाई

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:25PMगंगाखेडः प्रतिनिधी

रेल्वेपूल परिसरातील गोदापात्रात वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टर बुधवारी (दि.20)  सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी धडक कारवाई मोहिमेत तीन ट्रॅक्टर जप्त केले. शहराजवळ असलेल्या रेल्वेपूल परिसरात वाळु माफियांनी हैदोस घातला असून, वारंवार कारवाई करूनही वाळूउपसा थांबता थांबेना. काही दिवसापूर्वी तहसील प्रशासनाने रेल्वे पुल परिसरातील गोदापात्रात वाळु माफियांनी वाळू वाहतूकीकरीता तयार केलेले रस्ते जेसीबी लावून उध्वस्त केले होते.

पण वाळू माफियांनी पुन्हा रस्ते तयार करून वाळूउपसा सुरू केला होता.महसुल प्रशासनाच्या कोणत्याच कारवाईला न भिता ट्रॅक्टर वाळू माफिया रात्रंदिवस उपसा करीत आहेत.बुधवारी सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी पी.शिवशंकर हे रेल्वे पूल परिसरातील गोदापात्रात आले असता ,अनेक ट्रॅक्टरमध्ये वाळू भरणा सुरू होता.जिल्हाधिकार्‍यांना पाहताच अनेकांनी पळ काढला तर तीन ट्रॅक्टर हाती लागल्याने ते जप्त करण्यात आले.जिल्हाधिकारी गोदापात्रात आल्याचे कळताच महसुल प्रशासनाचे दत्तराव बिलापट्टे, तलाठी शिवाजीराव मुरकटे यांनी तिकडे धाव घेतली.जप्त  तीनपैकी एक ट्रॅक्टर गाळात फसले होते.