होमपेज › Marathwada › नवजात बालकांनाही मिळणार आधार क्रमांक

नवजात बालकांनाही मिळणार आधार क्रमांक

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:22AMबीड : शिरीष शिंदे

मतदार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर महत्वाच्या दस्तावेजांसोबत आधार क्रमांकालाही अनन्य साधारण महत्व आहे. आता नवजात बालकांची आधार नोंदणी करून त्यांनाही युनिक नंबर दिला जाणार आहे. या कामासाठी प्राथमिक स्वरुपात 102 अंगणवाडी पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या मार्फ त हे काम पुढील महिन्यापासून सुरू होईल.

25 लाखांहून अधिक नागरिकांनी आधार नोंदणी करू न युनिक आयडी प्राप्‍त केला आहे. आधार नोंदणी करताना डोळ्याची बुबुळे, हाताची ठसे स्कॅन करून घेतले जाते, तसेच सध्यस्थितीचा फोटोही सर्व्हेला जोडला जातो. त्यामुळे प्रत्येक  व्यक्‍तीची ओळख या युनिक आयडीद्वारे होते. आता जन्मलेल्या बाळापासून आधार नोंदणी करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 102 अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आधार नोंदणीसाठीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी आधार परीक्षाही घेतली होती. त्यांच्या मार्फ त ही नोंदणी होणार आहे. या कामासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांना वेगळे मानधन दिले जाणार आहे. पुढील कालावधीत इतर अंगणवाडी पर्यवेक्षिकांनाही असेच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Tags :  Marathwada, Aadhaar, number, newborns