Thu, Nov 15, 2018 09:50होमपेज › Marathwada › खर्च न सादर करणारे 710 उमेदवार रडारवर

खर्च न सादर करणारे 710 उमेदवार रडारवर

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:19AMबीड : प्रतिनिधी

निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना मुदतीत खर्च सादर करावा लागतो, मात्र ग्रामपंचायत निवडणूक होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप काही उमेदवारांनी  खर्च सादर केलेला नाही. बीड तालुक्यात असे 710 उमेदवार असून ते कारवाईच्या रडारवर आहेत. यातील 39 उमेदवार हे निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत.

बीड जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूक असो वा इतर, निवडणुकीला उभा राहणार्‍या उमेदवारास मुदतीत निवडणुकीवर झालेला खर्च सादर कराव लागतो. हा खर्च विहीत नमुण्यात सादर करावा लागतो. खर्च सादर न केल्यास 710 उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातील 39 उमेदवार हे सध्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. 710 उमेदवार हे केवळ बीड तालुक्यातील आहेत.