Wed, Nov 21, 2018 20:07होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील 550 आरोपी फरारी, पोलिसांना हवेत 1107 ‘वाँटेड’

जिल्ह्यातील 550 आरोपी फरारी, पोलिसांना हवेत 1107 ‘वाँटेड’

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:03AMकेज : दीपक नाईकवाडे

बीड जिल्ह्यात विविध गुन्हे करून साडेपाचशे आरोपी फरारी झाले आहेत. विविध गुन्ह्यांतील एक हजार एकशे सात आरोपी पोलिसांना हवे आहेत. पोलिस ठाणेनुसार पाहिजे असलेल्या आरोपींसह फरारी आरोपींची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात पोलिसांना विविध गुन्ह्यांतील एक हजार एकशे सात आरोपी हवे आहेत तर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील साडेपाचशे आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आहेत. बीड शहर पोलिस ठाणे पाठोपाठ केज, आष्टी, गेवराई, चकलांबा , पाटोदा  पोलिस ठाण्यातील आरोपी फरारी आहेत तर पोलिसांना विविध गुन्ह्यांतील पाहिजे असलेले सर्वाधिक आरोपी पोलिस ठाणे बीड शहर आहे. त्या पाठोपाठ अंबाजोगाई ग्रामीण , आष्टी, पाटोदा, धारूर, गेवराई, वडवणी पोलिस ठाण्याचा समावेश आहे. 

स जिल्ह्यातील बीड शहर पोलिसांना 276 तर  पेठ ग्रामीण 30, बीड ग्रामीण 33, शिवाजीनगर 29, पिंपळनेर 31, गेवराई  99, तलवाडा 24, चकलांबा 22, आष्टी 75, शिरूर 25 , अंभोरा 29, अमळनेर 12, पाटोदा 51, केज 6, नेकनूर 25,  युसूफवडगाव 11, धारूर 49 , अंबाजोगाई शहर 30, अंबाजोगाई ग्रामीण 104, परळी शहर 5 , परळी ग्रामीण 21 ,  बर्दापूर 9, माजलगाव शहर 30, 
स माजलगाव ग्रामीण 10, दिंद्रुड 10, वडवणी 44 तर शिरसाळा पोलिसांना विविध गुन्ह्यांतील 17  आरोपी अशा एकूण पाहिजे आहेत, असे जिल्ह्यातील एकूण एक हजार 107 आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. जिल्ह्यातील बीड शहर पोलिस ठाण्यात 58 तर, पेठ ग्रामीण 6, बीड ग्रामीण 31, शिवाजीनगर 16, पिंपळनेर 16, गेवराई  49, तलवाडा 19, चकलांबा 45, आष्टी 50, शिरूर 14, 
स  अंभोरा 7, अमळनेर 1, पाटोदा 40, केज 53, नेकनूर 39, युसूफवडगाव 14, धारूर  निरंक, अंबाजोगाई शहर 11, अंबाजोगाई ग्रामीण 1, परळी शहर 17, परळी ग्रामीण 19,  बर्दापूर 5, माजलगाव शहर 13, माजलगाव ग्रामीण 11, दिंद्रुड 1, वडवणी 1 तर शिरसाळा पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांतील 13  आरोपी फरारी असे एकूण साडेपाचशे आरोपी फरारी आहेत.