Fri, Jul 19, 2019 01:45होमपेज › Marathwada › रिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी

रिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी

Published On: Dec 29 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 11:57PM

बुकमार्क करा
नंदूरबार : प्रतिनिधी

नंदूरबार-धडगाव रस्त्यावर अमोदा-म्हसावद गावाजवळ अ‍ॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच ठार, तर 11 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृत व जखमी तलावडी आणि लक्कडकोट येथील रहिवाशी असून, हेे सर्व जण इंदल (आदिवासी उत्सव) मधून येत असताना हा अपघात झाला आहे.

शहादा तालुक्यातील धडगाव रस्त्यावर अमोदा गावाजवळ गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास इंदलवरून जाणार्‍या अ‍ॅपे रिक्षाला (एमएच 39 डी 895) धान्य वाहतूक करणारा ट्रकने (एमएच 18 ए 7473) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पाच जण जागीच मरण पावले. तर 11 जण जखमी झाले. जखमींवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये संजय रायमल रावताळे (32, रा. लक्कडकोट), गोरख इदास पावरा (40), रोहिदास कमा पावरा (65), गुलाब फकिरा पावरा (60), शिकार्‍या पाच्या रावताडे (65, सर्व रा. तलावडी, ता. शहादा) येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.