Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Marathwada › माजलगावात अनधिकृत बांधकामांना 47 लाखांचा दंड

माजलगावात अनधिकृत बांधकामांना 47 लाखांचा दंड

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:17PMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेच्या हद्दीत बांधकाम करणार्‍यांनी बांधकाम परवानगी घेतलेल्या व्यतिरिक्त अधिक अनधिकृत बांधकाम करणार्‍या एकूण 16 बांधकाम धारकांवर 47 लाख रुपये दंड आकारणी केली. मात्र यातील केवळ 7 लोकांनीच  19 लाख रुपयांचा भरणा केला तर उर्वरित 9 जणांकडे एकूण 28 लाखांपेक्षा जास्त दंड असताना यांच्याकडून निश्‍चित झालेला दंड वसूल केला गेलेला नाही.

शहरात मुख्य रस्त्यासह अन्य भागात घेतलेल्या बांधकाम परवानगीची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. या बांधकामावर नगरपालिका कसलीही कारवाई करीत नसल्याने शहरात सर्रासपणे बांधकामाचे उल्लंघन होताना दिसत आहे. घेतलेल्या परवानगीत पार्किंग न सोडणे व अनधिकृत पाच ते सहा मजली बांधकाम करणे सुरू आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले तरी नागरिकांच्या झालेल्या ओरडण्याने शहरात असलेल्या अन्य भागात असलेल्या 16 बांधकामधारकांना नगरपालिकेने नोटीस देऊन दंड आकारणी करण्यात आली. यात एकूण 47 लाख 99 हजार 392 रुपये एवढा दंड आकारला मात्र यातील 9 लोकांनी  28 लाख 11 हजार 707 रुपये अद्याप दिले नाही. या वसुली साठी न.प.ने.कसलाही प्रयत्न केला नसल्याचे दिसून येत असून यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.