Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Marathwada › 4562 कुटुंबांना दिली वीज जोडणी

4562 कुटुंबांना दिली वीज जोडणी

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:58PMहिंगोली ः प्रतिनिधी

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या 10 हजार 604 कुटुंबाना अवघ्या 11 दिवसात वीजजोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम करण्यात आले आहे. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 51 हजार 20 पैकी केवळ 4562 कुटुंबीयांना वीज जोडणी देण्यात आली आहे. 

देशातील नागरिकांना 24 तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबरला 2017 रोजी प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना अर्थातच सौभाग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम  भागांतील खेडेपाडे आणि वाड्या वस्त्यांमधून राहणार्‍या शेवटच्या घटकांनाही वीज जोडणी द्यावयाची आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सौभाग्यच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वीज न पोहचलेल्या कुटुंबाना विजेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व वीजजोडण्या जुलै 2018 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून त्यादृष्टीने महावितरणने जलदगतीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

7 जुलै 2018 पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून नांदेड परिमंडळातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 85 हजार 777 कुटुंबीयांपैकी 10 हजार 604 कुटुंबीयांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नांदेड परिमंडळात समावेश असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वीज जोडणीपासून वंचित असलेल्या 51 हजार 20 कुटुंबीयांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी द्यावयाची सूचना 7 जुलै पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून आजपर्यंत 4 हजार 562 कुटुंबीयांना वीज जोडणी देण्यात आली आहे. 

या योजनेतून गोरगरिबांना दारिद्य्ररेषेखालील कुटुंब मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पीनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीज जोडणी पासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना दारिद्र्यरेषेवरील कुटुंब अवघ्या 500 रुपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे.