Sun, May 26, 2019 08:44होमपेज › Marathwada › ‘कोरडवाहू’च्या आराखड्यास ४१ कोटी

‘कोरडवाहू’च्या आराखड्यास ४१ कोटी

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:16PMपरभणी : प्रतिनिधी

राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत राज्यात कोरडवाहू क्षेत्र विकास घटकाच्या सन 2018-2019 च्या वार्षीक आराखड्यासाठी शासनाने 4 1कोटी 60लाख 84 हजार  रुपये निधीची तरतूद केली आहे. सदरील निणर्र्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 21 जून 2018 रोजी घेतला आहे. 

सन 2014-2015 पासून केंद्र शासन पुरस्कृत योजनांची पुनर्रचना करून हे अभियान राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यातील शाश्‍वत शेती कार्यक्रम कोरडवाहू क्षेत्र विकास घटक म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाचे प्रमाण 60.40  आहे.  सन 2018-19 करिता केंद्राचा 24 कोटी 96 लाख 50 हजार   व राज्य सरकारचा 16 कोटी 64 लाख 33 हजार अशा एकूण 41कोटी 60लाख 84 लक्ष रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास  मान्यता देण्यात आली आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 9 कोटी 85 लाख  लाख, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 14 कोटी 7 लाख 50 हजार , अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 11कोटी 7 लाख 50  हजार असा एकूण 12 कोटी 50 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.  या निधीचे जिल्हानिहाय व कार्यालयनिहाय वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या अभियानाचा लाभ कोरडवाहू शेतकर्‍यांना होणार आहे.

एकात्मिक शेती पध्दती योजनानिहाय 50 टक्के अनुदानावर  वाटपः फलोत्पादन आधारित शेती पध्दती मंजूर घटक 2160 असून यासाठी 5 कोटी 40 लाख 50 हजार, पशुधन आधारित शेतीपध्दती 2430 घटक 6 कोटी 7 लाख 50 हजार,  दुग्धोत्पादन आधारित शेती पध्दती 2835 घटक 11 कोटी 34 लाख असे 22 कोटी 81 लाख 50 हजार रुपये. 

मूल्यवर्धक आणि साधन संपत्ती संवर्धन : ग्रीन हाऊस ट्युब्युलर टाईप नैसर्गिक वायविजन 60000 घटक 28 कोटी 80 लाख, मधुमक्षिका पालन 180 शेतकरी 36 लाख, शेडनेट हाऊस 135000 घटक 4 कोटी 79 लाख 25 हजार, काढणी पश्‍चात साठवणूक तंत्रज्ञान 270 घटक 54 कोटी, मूरघास युनिट 135 घटक 16 कोटी 8 लाख 75 हजार, गांडूळखत युनिट कायमस्वरुपी 315 घटक 15 कोटी 7 लाख 50 हजार, हिरवळीचे खत 2000 घटक 18 लाख 90 हजार रुपये.