Sat, Jul 20, 2019 15:05होमपेज › Marathwada › मांजरा धरणात 40 टक्के पाणी शिल्लक 

मांजरा धरणात 40 टक्के पाणी शिल्लक 

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:10AMअंबाजोगाई :  रवी मठपती 

अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंब व काही खेडेगावांच्या दृष्टीने मांजरा धरण अत्यंत महत्त्वाचे आहे . उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस  वाढत चालली आहे, त्याप्रमाणात मांजरा धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. आजमितिला मांजरा धरणात केवळ 40 टक्के पाणीसाठा  शिल्लक आहे. 60 दलघमी पाणी शेतीच्या सिंचनासाठी तर 45 दलघमी पिण्यासाठी म्हणून वापर करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या धनेगाव येथे असलेल्या मांजरा धरणातून लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातल्या लातूर शहर, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंबसह काही खेडे  गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. तिन्ही जिल्ह्याच्या दृष्टीने मांजरा धरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हे धरण 100 टक्के भरले. या धरणातून लातूर एमआयडीसी व शहरांसाठी कार्यान्वित असलेली पाणीपुरवठा योजना इतर शहरांच्या तुलनेत सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना आहे. यावर्षी  धरण शंभर टक्के भरले होते.

त्यामुळे  धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून आत्तापर्यंत तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 224 दलघमी आहे आहे. त्यापैकी उपयुक्त साठा हा 176.963  दलघमी आहे. सध्या 119 दलघमी पाणीसाठा आहे. 11 एप्रिल पर्यंत धरणांमध्ये अवघा 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पीक सिंचनासाठी आत्तापर्यंत तीन वेळा पाणी सोडण्यात आले असून आणखी दोन वेळा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. धरणातील पाणीसाठा, उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन तसेच पाणी पाझरत असल्यामुळेही पाणी पातळी कमी होत आहे. त्याचप्रमाणे पसरलेल्या पाण्यावर आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. 

Tags : Marathwada, 40, percent, water, balance,  Manjra Dam