होमपेज › Marathwada › मुलींवर अत्याचाराच्या वर्षभरात 32 घटना

मुलींवर अत्याचाराच्या वर्षभरात 32 घटना

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:48PMबीड : प्रतिनिधी

कठुआ, उन्नाव व सुरतमधील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनांनी देश हादरून गेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचे समोर आले आहे. मागच्या वर्षभराच्या कालीांवधीत लहान मुलींवर बलात्काराच्या 32 घटना घडलेल्या आहेत. पोस्को कायद्यार्तंगत विविध ठाण्यात 71 गुन्हे दाखल झाले आहेत. 

लहान मुलींवर लैंगिक अत्याचारासह बलात्कार, विनयभंग करणे, पळवून नेणे, छेडछाड करणे यांचा समावेश पोस्को कायद्यात आहे. या प्रकारचा गुन्हा ठाण्यात झाल्यानंतर आरोपींना सहज जामीन मिळत नसल्याचा अनुभव अधिकारी व्यक्‍त करतात. कायदा कडक असला तरी लहान मुलींवर अत्याचार वाढत असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने मान्य केले. मुलींवर अत्याचार होऊ नयेत म्हणून त्यासाठीच्या उपाय योजना केल्या जात असून शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जात असल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले.

पोस्को कायद्यार्तंगत विविध ठाण्यात 71 गुन्हे दाखल झाले आहेत. लहान मुलींवर अत्याचार कमी व्हावेत यासाठी शिक्षकांना सूचना देऊन त्यांच्याकडे विद्यार्थीने काही तक्रार केल्यास त्याची माहिती तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यास देण्यास सांगितले आहे. लहान मुली अत्याचार होत असले तरी त्याची माहिती इतरांना सांगण्यात घाबरतात. अत्याचारीत मुलीच्या जवळच्या व्यक्‍तीला माहिती होताच त्याने पोलिसांची मदत घेतली पाहिजे.

Tags : Marathwada, 32, incidents, year,  atrocities, against, girls