Wed, Jul 24, 2019 12:14होमपेज › Marathwada › 31 हजार 952  शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार

31 हजार 952  शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 1:03AMपालम : मारुती नाईकवाडे

शेतकर्‍यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या  जाणार्‍या कापूस पिकावर गतवर्षी गुलाबी रंगाच्या बोंडअळीने थैमान घातले होते. तर याच पिकाच्या नुकसानीचे किचकट पद्धतीच्या तक्रार अर्जाच्या कचाट्यात शेतकरी अडकला होता. जिल्ह्यातील प्रपत्र क नुसार तालुक्यातील 31 हजार 952  शेतकर्‍यांचा   पात्र यादीमध्ये समावेश न झाल्याने  त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. 

31 हजार 952 शेतकर्‍यांनी यावर्षी कापूस पिकांची लागवड  केली होती.  अचानकपणे कापसावर  गुलाबी रंगाची बोंडअळीने  थैमान घातले. कापसाचे उत्पादन क्षमतेपेक्षा कमी झाल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बोंडअळीमुळे व विविध रोगांमुळे कापसाच्या झालेल्या नुकसानाचे सरसकट सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याची घोषणा झाल्याने तालुक्यातील तीन मंडळांतील तलाठ्यांच्या साह्याने सर्व्हे करून लागवड करण्यात आली. 31952 शेतकर्‍यांनी 16783 हेक्टर वरील पिकाची लागवड करण्याचा  सर्वेेक्षण करून तालुका समितीला दिला होता. यामध्ये पालम मंडळाला 10671 शेतकर्‍यांनी 5486 हेक्टरवर, 37364800 मदत मिळणे अपेक्षित होती, बनवस मंडळातील 12227 शेतकर्‍यांनी 6459, हेक्टरवर  439212200 रक्कम तर चाटोरी मंडळातील 9054 शेतकर्‍यांनी 4838 हेक्टरवरील 32898400 रक्कम एकूण 114124400 दिली जाणार असल्याचा अहवाल करण्यात आला आहे. यामध्ये 31952  शेतकर्‍यांनी 16783  हेक्टरवर   कापूस या पिकाची लागवड करण्यात आल्याचा अहवाल आहे. तसेच यांच अहवालात  सर्वच क्षेत्र 33% वरील नुकसानग्रस्त झालेल्यांचे   जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आलेला होता. मग प्रशासनाने राज्य सरकारला प्रपत्र क नुसार दिलेल्या माहितीनुसार एकाही शेतकर्‍याचे 33% पेक्षा जास्त नुकसान न झालेला अहवाल कोणत्या निकषानुसार दिला? मग तालुका समितीचा अहवाल  चुकीचा आहे ? यासारखे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडले आहे.