Sun, Nov 18, 2018 05:46होमपेज › Marathwada › मराठवाडा,विदर्भात गारपिटीने घेतले चौघांचे बळी (video)

मराठवाडा,विदर्भात गारपिटीने घेतले चौघांचे बळी (video)

Published On: Feb 11 2018 6:06PM | Last Updated: Feb 11 2018 6:07PMजालना : प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भाला वादळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक भागात गारपिट झाली आहे. या गारपिटीने चार बळी घेतले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. या गारपिटीत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

काय? मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics 

जालन्यातील वंजार उमरद गावातील रहिवासी असलेले नामदेव शिंदे (वय ७०) यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथील आसाराम गणपत जगताप (वय ६०)  यांचाही या गारपिटीत मृत्यु झाला. 

वाशिम महागाव येथील यमुना हुंबाड या महिलेचाही दुर्दैवी अंत झाला आहे. हिंगोली तालुक्यातील इंचा येथील नागसेन हरिभाऊ तपासे (वय २९) हा तरूण जखमी झाला आहे. तसेच बुलढाना जिल्ह्यातील गिरोली येथील १६ वर्षीय तरूणीचा अंगावर विज पडून मृत्यू झाला आहे. 

अवकाळी पाऊस;  नुकसानीचे त्वरित पंचनामे करा : पंकजा मुंडे 

गारपिटीतील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची  मागणी खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. 

हिंगोली शहरातील सुराणा नगर भागात राहणारे पोलिस कर्मचारी कोकाटे यांच्या घरावरही वीज पडल्याने घराच्या वरच्या भागातील भिंतीचे थोडे नुकसान झाले. यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.