Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Marathwada › तुळजापूरात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तुळजापूरात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Published On: Feb 11 2018 2:16PM | Last Updated: Feb 11 2018 2:16PM उस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन

तुळजापूर तालूक्यातील नंदगाव येथे ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मयत बंजारा समाजातील ऊस तोड कामगार असून  राजू मिटू राठोड, ललीता राजू राठोड, सार्थीक राजू राठोड अशी मृत्यांची नावे आहेत. हे सर्व हंगरगा( इंदीरा नगर तांडा ) ता.तुळजापूर  जि.उस्मानाबाद येथील रहिवासी होते.