Sun, Sep 23, 2018 21:56होमपेज › Marathwada › ललिताची ललित झालेला पोलिस आज कामावर रूजू

ललिताची ललित झालेला पोलिस आज कामावर रूजू

Published On: Jun 19 2018 12:11PM | Last Updated: Jun 19 2018 12:11PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

लिंगबदल शस्ञक्रिया करुन ललिताचा ललित झालेला पोलिस पुरुष म्हणुन आज दि.१९ रोजी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात रुजू झाला. बीड पोलिस दलात महिला पोलिस रुजू झालेल्या ललिता साळवे यांच्या शरीरातील हर्मोन्सच्या बदलामुळे स्ञी नसून पुरुष असल्याची भावना त्यांना झाली. त्यानंतर लिंगबदल करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले व त्याल यशही आले.

यशस्वी शस्ञक्रिये नंतर आता ललित झालेला पोलिस आज दि.१९ रोजी प्रथम समयी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांनी रुजू करुन घेतले. त्यानंतर ललित साळवे याला आज जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीधर यांच्या समक्ष भेट घेऊन ललिता म्हणून महिला पोलिस रुजू झाल्यामुळे आज असलेल्या ललितच्या पोलिस खात्याच्या अभिलेखावर स्ञी असा उल्लेख असलेल्या जाग्यावर पुरुष व ललिता ऐवजी ललित मधुकर साळवे अशी नोंद करण्यात येणार आहे.

महिला पोलिसास दिली जाणारी टोपी ऐवजी पुरुष पोलिसांची टोपी या ललित साळवे यास मिळणार आहे. आज शहर पोलिस ठाण्यात रुजू होताना ललितने पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन प्रवेश घेतला.यावेळी ललितच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद दिसत होता.