Wed, Nov 21, 2018 21:39होमपेज › Marathwada › निलंग्यात २७ लाखाचा गुटखा जप्त

निलंग्यात २७ लाखाचा गुटखा जप्त

Published On: Feb 13 2018 10:42PM | Last Updated: Feb 13 2018 10:41PMलातूर : प्रतिनिधी

निलंगा शहरात एका ट्रकमधून २७ लाख २८ हजार ८०० रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवरात्री निमित्त निलंगा शहरातील  मार्गावर सोमवारी रात्री १० च्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी एका ट्रकचा संशय पोलिस उपनिरीक्षक कल्याण सुपेकर यांना आला. त्‍यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये  गुटख्याची १५० व सुगंधी सुपारीची ८० पोते हाती लागली. हा गुटखा हैद्राबाद येथून आला होता. असे सुपेकर यांनी सांगितले.