होमपेज › Marathwada › ट्रक चालकांच्या संपामुळे 25 कोटींचे व्यवहार ठप्प

ट्रक चालकांच्या संपामुळे 25 कोटींचे व्यवहार ठप्प

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 12:09AMबीड : प्रतिनिधी

डिझेल दर वाढीच्या विरोधात जिल्हा ट्रक चालक व मालक संघटनेने देशव्यापी संपात 20 जून पासून सहभाग घेतला. या संपामुळे जिल्ह्यातील अडीच हजार ट्रक थांबलेली असल्यामुळे जवळपास 25 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शिवाय व्यापार्‍यांचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ट्रक जागेवर उभे असल्याने बाहेर जिल्ह्यातून  येणारा व बाहेर जाणार्‍या सर्व प्रकारच्या मालांचे व्यवहार थांबलेले आहे. याचा प्रमुख फ टका मोठ्या व्यापार्‍यांना रोजच सहन करावा लागत आहे.  

देशभरात डिझेल दर वाढीसह इतर काही मागण्यांसाठी 16 जून पासून संप पुकारण्यात आला होता. या संपात जिल्ह्यातील संघटना सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र 20 जूनपासून या संपात सहभागी झाल्या. त्यामध्ये ट्रक चालक व मालकांचा समोवश आहे. जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट अंर्तगत सुरू असलेल्या अडीच हजार ट्रकची चाके सदरील संपामुळे थांबलेली आहेत. प्राथमिक स्वरुपात या संपाची तीव्रता जाणवली नव्हती, मात्र आता सातव्या दिवशीही संप सुरू असल्याने याचे परिणाम जानवायला सुरुवात झाली आहे.