Thu, Aug 22, 2019 04:19होमपेज › Marathwada › सायकलवरून २०० कि.मी. प्रवास १० तासांत पूर्ण

सायकलवरून २०० कि.मी. प्रवास १० तासांत पूर्ण

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMजिंतूर : प्रतिनिधी

शहरातील शहेजाद खान यांनी मनाच्या प्रबळ इच्छाशक्‍तीच्या बळावर जिंतूर-जालना व परत जिंतूर असा 200 की.मी.चा सायकल प्रवास 11 मार्च रोजी पूर्ण करून शहराच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी, पोलिस प्रशासन व क्रीडाप्रेमींनी त्यांचा गौरव केला आहे.

मागील दशकात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. म्हणून भविष्यकालीन संकट कमी करण्यासाठी शहरातील  शहजाद पठाण यांनी निसर्ग व विविध आजारांपासून शरीराचे जतन करण्यासाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून प्रत्यक्ष कृतीतून शहर व परिसरात सायकल चालविण्याचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. सदरील चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी देवेन्द्र अण्णा भुरे यांच्या पुढाकारातून सायकल समूहाची स्थापना करण्यात आली.

तेव्हापासून सहा दिवस शहरात तर दर रविवारी तालुक्यातील ग्रामीण भागात समूहातील सदस्यांना सोबत घेऊन संदेश दिला. यासोबतच शहरातील नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी तसेच सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा उद्देशाने 11 मार्च रोजी सकाळी 5 वाजता जिंतूर येथून निघून जालना व त्याच मार्गे जिंतूर असा प्रवास 200 किमीचे अंतर त्यांनी अवघ्या 10 तासांत पूर्ण करून शहराच्या इतिहासात एक अनोख्या विक्रमाची नोंद केली.  त्यांच्या या यशाचे  शकील अहेमद,रफीक तांबोळी,बालाजी शिंदे,अलिम शेख,यांच्यासह शहरातील सायकलप्रेमी व्यकटेश भुरे, देवेंद्र भुरे, विकी शर्मा तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे व विविध सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी यांनी कौतुक करून गौरव केला.

माझ्या स्वप्नाला पंख फुटले  

निसर्गाच्या समतोलासाठी तसेच शरीराच्या सुदृढकरिता सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. यासाठी मागील तीन महिन्यांपासून सायकलवर शहर व परिसरात निसर्ग व शरीराच्या जतनाकरिता संदेश दिला.त्यातच लांब पल्ल्यासाठी सायकल चालविण्याच्या माझ्या स्वप्नाला पंख फुटले. जिंतूर - जालना - जिंतूर हा 200 कि.मी.चा प्रवास सायकलवर पूर्ण केला.          

- शहेजाद खान, जिंतूर