Wed, Nov 21, 2018 05:10होमपेज › Marathwada › हिंगोलीत २ वर्षाच्या मुलीचा बादलीत पडून मृत्यू

हिंगोलीत २ वर्षाच्या मुलीचा बादलीत पडून मृत्यू

Published On: May 17 2018 4:16PM | Last Updated: May 17 2018 4:15PMवसमत (जि. हिंगोली): प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील कोठारी येथे दोन वर्षीय चिमुकचा बादलीत पडून मृत्यू झाला आहे. धनश्री विश्वनाथ नरवाडे असे मृत्‍यू झालेल्‍या मुलीचे नाव आहे. 

वसमत तालुक्यातील कोठारी येथे गुरूवारी (दि.17) सकाळी आठ वाजेच्या सुमारास  विश्वनाथ नरवाडे यांची मुलगी धनश्री ही घरात खेळत होती. खेळत असतानाच ती घरामध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत पडली. हा प्रकार घरातील लोकांच्या लक्षात येताच तिला पाण्यातून बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी वसमत येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्‍याठिकाणी डॉक्‍टरांनी धनश्रीचा मृत्‍यू झाल्याचे घोषीत केले.