Tue, Jan 22, 2019 09:37होमपेज › Marathwada › नदीत बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्‍यू 

नदीत बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्‍यू 

Published On: Sep 09 2018 5:04PM | Last Updated: Sep 09 2018 5:04PMवसमत : प्रतिनिधी 

वसमत तालुक्यातील माळवटा शिवारातील आसना नदीवर चिखलाचे बैल बनविण्यासाठी माती आनण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मुत्‍यू झाला आहे. विशाल ठोंबरे (रा. रांजोना) असे मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मुत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.  

वसमत तालुक्यातील माळवटा शिवारातील आसना नदीवर रविवार सकाळी १०.३० वा विशाल ठोंबरे हा बैल बनविण्यासाठी चिखल आनयला गेला असताना त्याचा नदीत बुडून मुत्‍यू झाला. याप्रकरणीबाबुराव नादरे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मुत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.