Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Marathwada › 7 वर्षांत 670 घरांवर 17 कोटींचा खर्च

7 वर्षांत 670 घरांवर 17 कोटींचा खर्च

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMपरभणी : प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी शासनाने रमाई घरकूल योजना  सुरू केली. 2010 ते 2013 मध्ये एकूण 1 हजार 189 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी 869 प्राप्‍त अर्जांपैकी 670 घरांचे बांधकाम करण्यात आले. अद्यापही 199 घरांचे बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. एकूण उद्दिष्टांपैकी  519 घरे बांधणे शिल्‍लक आहेत. तसेच 2016-17 व 17-18 मध्ये मनपास 3 हजार 600 घरांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत या योजनेवर  मनपाने केवळ 16 कोटी 82 लाख 800 हजार रुपये खर्च केला आहे.    

सदरील योजनेसाठी शासनाकडून  73 कोटी 94 लाख 41 हजार 867 रुपयांचा निधी मनपास प्राप्‍त झाला आहे. शासनाने 2012 ते 13 मधील 869 प्राप्‍त अर्जांपैकी 670 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लाख रुपये निधी देऊन घरांचे बांधकाम पूर्ण केले. 181 घरकुलांचे काम प्रगतिपथावर असून 18 घरकूलधारक लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे  वाटप केले. 2016 ते 18 मधील 3 हजार 600 घरकुलांचे उद्दिष्ट आहे.यात 1 हजार 795 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्‍त झाले असून यापैकी 1 हजार 481 जणांचे अर्ज पात्र झाले आहेत. केवळ  408 लाभार्थ्यांच्या स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. अद्यापही 1 हजार 73 लाभार्थ्यांच्या संचिका पाहणी प्रक्रियेत आहेत. मनपाने 2012 पासुन केवळ  670 घराचे काम पूर्ण तर 408 घरकुलांची स्थळ निश्‍चित केली आहे. चार महिन्यांपासून शासनाकडून रमाई घरकूल योजनेपोटी मनपास 73 कोटी 94 लाख 41 हजार 867 रुपयांचा निधी मिळाला.  यात पात्र  लाभार्थ्यांपैकी अनेक जण  लाभापासून वंचित आहेत. यासंदर्भात मनपा प्रशासनाने शहरातील प्लॉट नावे असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी वसाहतींमध्ये जाऊन त्यांच्या योजनेची माहिती देण्याकरिता बैठका घ्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.

स्वतःची जागा असूनही अनेकजण वंचित : स्वतःच्या मालकीची जागा असूनही अनेक लाभार्थी घरकूल योजनेपासून वंचित आहेत. मनपा प्रशासनाने प्रभागनिहाय बैठका घेऊन वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण करायला हवे. राहण्याजोगे घर नाही अशांना त्वरित घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.