Thu, Jun 27, 2019 16:51होमपेज › Marathwada › बीड : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

बीड : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

Published On: May 08 2018 2:58PM | Last Updated: May 08 2018 2:58PMअंबाजोगाई : प्रतिनिधी  

मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात आज (दि. ८) रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यश नंदकुमार देशपांडे (वय १६) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. 

आज, मंगळवारी सकाळी यश अन्य दोन मित्रांसोबत कंपनी बाग परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पोहण्यात तरबेज नसल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. यावेळी तिथे पोहण्यासाठी आलेल्या शेख अफजल या तरुणाने विहिरीत उडी मारून बुडालेल्या यशला बाहेर काढले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या यशला तातडीने जवळच असलेल्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

यश हा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार देशपांडे यांचा मुलगा होता. योगेश्वरी नूतन शाळेचा विद्यार्थी असलेल्या यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो एक उत्तम फुटबॉलपटू आणि निष्णात खो-खो खेळाडू होता, अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. अतिशय शांत स्वभावाच्या आणि शिक्षणासोबतच खेळातही अग्रेसर असलेल्या गुणी यशच्या अकाली मृत्यूने त्याचे नातेवाईक, शिक्षक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.