Fri, Nov 16, 2018 10:51होमपेज › Marathwada › एकाच केंद्रावरील 15 विद्यार्थी रेस्टिकेट  

एकाच केंद्रावरील 15 विद्यार्थी रेस्टिकेट  

Published On: Mar 12 2018 1:17AM | Last Updated: Mar 12 2018 1:14AMआष्टी : प्रतिनिधी   

तालुक्यातील डोईठाण येथील पद्मावती विद्यालयात दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयाचा पेपर देणारे 15 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. शिक्षणाधिकारी सोनवणे यांच्या पथकाने या 15 परीक्षार्थींना शनिवारी रेस्टिकेट केले. तालुक्यात दहावीच्या परीक्षा सुरू असून डोईठाण येथील पद्मावती विद्यालयातील केंद्रावर परिसरातील आठ शाळांमधील 350 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शनिवारी गणिताचा पेपर सुरू असताना शिक्षणाधिकारी सोनवणे यांच्या पथकाने केंद्राला अचानक भेट दिली. या वेळी15 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने त्यांना रेस्टिकेट करण्यात आले. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. 

कॉपीमुक्तीला हरताळ
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तालुक्यात कॉपीमुक्तीला हरताळ फासला जात असून अनेक ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे.