Mon, Mar 25, 2019 04:59
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › रिधोरीच्या राममंदिरात १३ मूर्तींची चोरी 

रिधोरीच्या राममंदिरात १३ मूर्तींची चोरी 

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:31PMमाजलगाव : प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील रिधोरी येथील राम मंदिरातील तांबे पितळाच्या 30 मूर्तीपैकी तेरा मूर्ती शनिवारी रात्री चोरुन नेल्याची घटना घडली.  

माजलगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. मंजरथ येथे दिवसाढवळ्या चोरी झाली होती. तर पुन्हा शनिवारी रात्री रिधोरी येथील राम मंदिरातील 13 मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. या मंदिराचे पुजारी गंगाराम रामदासी हे तीन दिवसांपूर्वी गावाला गेले होते.

ते परत आले असता त्यांना मंदिरातील 30 मूर्तीपैकी 13 मूर्ती गायब असल्याचे दिसले. तांब्या-पितळाच्या या मूर्ती होत्या. या प्रकरणी या मदिरांचे पुजारी गंगाधर रामदासी यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 15 हजार रुपयांच्या मूर्ती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Tags : beed, Ridhori, Majalgaon news, crime, Ram temple, stolen,