Fri, Jul 19, 2019 18:14होमपेज › Marathwada › राज ठाकरेंसह 117 जणांना नुकसान भरपाईच्या सूचना

राज ठाकरेंसह 117 जणांना नुकसान भरपाईच्या सूचना

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:31PMबीड : शिरीष शिंदे

राजकीय व सामाजिक आंदोलनांमुळे  दाखल झालेले  खटले    मागे घेण्याच्या कारवाईला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या व सध्या न्यालयात प्रलंबित असलेल्या 18 गुन्ह्यांतील 117 आरोपींकडून आंदोेलना दरम्यान करण्यात आलेल्या  नुकसानाची भरपाई म्हणून  2 लाख 49 हजार रुपये जमा करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिल्या आहेत.  राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्यासाठी आढावा बैठक 19 मार्च रोजी पार पडली होती. जिल्हादंडाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीस सरकारी अभियोक्‍ता सहाय्यक संचालक, अपर पोलिस अधीक्षक वैैभव कलुबर्मे यांची उपस्थिती होती. त्यावेळी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

शिफारस करण्यात आलेल्या 18 प्रकरणातील आरोपींकडून शासकीय मालमत्तेची नुकसान भरपाई बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या 18 प्रकरणातील नुकसान भरपाई भरण्यासंदर्भात संबंधितांना स्मरणपत्र देण्याचे सूचित करण्यात आले. एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई  रक्‍कम जमा न केल्यास न्यायालयीन कारवाई सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले होते.  त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने 11 पोलिस ठाण्यांना पत्र पाठवून आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे सूचित केले.   बैठकीला एक महिना पूर्ण झाल्यानंतर  संबंधित अधिकारी नुकसानभरपाईच्या वसुलीचा आढावा घेत आहे. या संदर्भात   26 एप्रिल रोजी  बैठक होणार असून , ज्यांनी  नुकसान भरपाई दिली असे नेते व कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सू त्रांनी दिली.  

 सोमवारी पाठविली सूचना

राजकीय व सामाजिक स्वरुपाच्या 18 आंदोलनांची गुन्हे पाटोदा, गेवराई, शिरूर, दिंद्रूड, केज, बीड ग्रामीण, शिवाजी नगर, माजलगाव शहर, वडवणी, पेठबीड या ठाण्यांमध्ये नोंद आहे. गुन्हा नंबर व कलमासह या सर्व पोलिस ठाणे प्रभारींना सोमवारी 9 एप्रिल रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. पुढील दहा दिवसांमध्ये नुकसान भरपाईची रक्‍कम भरून घेतली जाण्याची शक्यता आहे.

Tags : Marathwada, 117,  people, including, Raj Thackeray, compensation, instructions