Mon, Aug 19, 2019 05:00होमपेज › Marathwada › 11 रेशन दुकानदारांची अनामत रक्‍कम जप्‍त 

11 रेशन दुकानदारांची अनामत रक्‍कम जप्‍त 

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:12PMपरभणी : प्रतिनिधी

अन्नसुरक्षा अधिनियम 2013, अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2012 व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अन्वये असलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या जिल्ह्यातील 11 स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्‍कम जप्‍त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. राज्यात प्रत्येक महिन्यातील सात तारीख ही अन्नदिन म्हणून मानण्यात यावी. याच दिवशी  गावातील चावडी, रास्तभाव दुकाने, सार्वजनिक ठिकाणी  उपस्थित असलेल्या दक्षता समिती सदस्य व इतर स्थानिक लोकांच्या उपस्थितीत जाहीर पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना विहीत परिमाणानुसार धान्याचे वितरण करण्यात यावे. अन्‍नदिनाच्या दिवशी वरील पद्धतीने धान्य वाटप केल्यानंतर शिल्‍लक धान्य उर्वरित लाभार्थिंना स्वस्त भाव दुकानातून 8 ते 15 या लगतच्या  सप्‍ताहात विक्रीकरीता उपलब्ध करण्यात यावे. सदरील सप्‍ताह अन्‍न सप्‍ताह म्हणून अमलात आणावा. अशा प्रकारे संपूर्ण राज्यात शिधापत्रिकाधारकांना महिन्यात किमान 8 दिवस रास्त भाव दुकानातून हमखास धान्य मिळण्याची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. असे असताना देखील परभणी तालुक्यातील 11 स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. 
 

तालुक्यातील परभणी शहरातील डी. बी. कांबळे, पार्वतीबाई भराडे, कीर्तनकार, जी. बी. साळवे, दैठणा येथे लक्ष्मण कच्छवे, तट्टूजवळा येथील ए. ए. पाचकोर पर्यायी व्यवस्था एस. एस.आनेराव रास्त भाव दुकानदार, माळसोन्‍ना येथील जी. टी. लाड, पोरजवळा येथील भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, कैलासवाडी येथील अश्रूबाई कवळासे, साई मध्यवर्ती सह सोसायटी, अंगलगाव येथील पी.टी.कांबळे, पिंपळगाव समी. येथील एस.यु.मोरे या दुकानदारांची परवान्यापोटी 100 टक्के अनामत रक्‍कम जप्‍त करण्यात आली आहे,  अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली आहे.

Tags : Marathwada, 11, Ration, shoppers, seized, deposit, amount