Thu, Jul 18, 2019 10:41होमपेज › Marathwada › लातूर : दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

लातूर : दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:26PMलातूर ः प्रतिनिधी

लातूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केली. 17 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान तो मरण पावला. अमन अजय समुद्रे असे त्याचे नाव असून शिक्षकाने त्याचा अवमान केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दिल्याने संतोष आळंदकर या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.

अमन हा बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. 14 फेब्रुवारी रोजी तो शाळेत गेला होता. अमन व त्याचे मित्र भगवे फेटे, भगवा शर्ट व पांढरा पायजमा अशा वेशात शाळेत गेले होते. ते पाहून त्यांच्या मित्रांनी ‘जय भवानी,  जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर त्यांचे शिक्षक संतोष आळंदकर यांनी त्यांना अशा वेशात शाळेत यायचे नसते व घोषणा द्यायच्या नसतात, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी फेटे काढले होते. आळंदकर यांच्याकडे संतोष शिकवणीस होता.

15 फेब्रुवारी रोजी तो आळंदकर यांच्याकडे शिकवणीस गेला असता त्यांनी स्कूल डे दिवशी ज्यांनी भगवे फेटे घातले होते त्यांनी माझ्या शिकवणी वर्गास बसायचे नाही, असे सांगितले. त्यावर संतोष निघून गेला. 

सर्वांसमोर आळंदकर यांनी केलेल्या अवमामामुळे अमन व्यथित झाला होता. या तणावात त्याने 16 फेब्रुवारी रोजी बाथरुममध्ये जाऊन स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतले व पेटवून घेतले. लातुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ही हकीकत संतोषने आपणास सांगितली असल्याचे अजय समुद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.