Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Marathwada › बीड : दहावी - बारावीच्या बाराशे उतरपत्रिका जळून खाक

बीड : दहावी - बारावीच्या बाराशे उतरपत्रिका जळून खाक

Published On: Mar 03 2018 9:25PM | Last Updated: Mar 03 2018 9:25PMकेज/बीड : प्रतिनिधी 

दहावी आंणि बारावीच्या उतरपत्रिका ठेवलेल्या खोलीला आग लागून १ हजार ११९ उतरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली. बीड जिल्ह्यातील केज येथे ही घटना घडली आहे.

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत. केज शहरातील गट संशोधन केंद्रात तालुक्यातील बारावीच्या नववी व दहावीच्या सर्व केंद्रामधील उतरपत्रिका कस्टोडियममध्ये ठेवल्या जातात. शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. या केंद्रात इतर विषयाच्याही उतरपत्रिका होत्या. शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागून, रुममधील उतरपत्रिकाचा गठ्ठा जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच, शेजारील लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. आग कशामुळे लागली याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस, वीज मंडळाचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते. या आगीत जास्त उतरपत्रिका जळल्या असल्याचे समजते.