Wed, Jul 24, 2019 12:34होमपेज › Marathwada › 108 रुग्णवाहिका ठरली जीवनदायी

108 रुग्णवाहिका ठरली जीवनदायी

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:56PMपरभणी : नरहरी चौधरी

राज्य आरोग्य विभाग आणि बीव्हीजी (भारत विकास ग्रुप) इंडिया लिमिटेड या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून डायल 108 रुग्णवाहिका सेवेद्वारे परभणी जिल्ह्यातील 18  हजार 128  रुग्णांनी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा लाभ घेतला आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीतील 4 हजार 643 गरोदर माता, 975 अपघाती रुग्णांचा यात समावेश आहे. 

वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकदा अपघातातील जखमींचा प्राण जाण्याचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या 108 टोल फ्री रुग्णवाहिका सेवेने 12 महिन्यांत अनेक रुग्णांचे प्राण वाचले. जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सेलू, पाथरी, पालम, जिंतूर, सोनपेठ, रामपुरी, झरी, कोल्हा, दैठणा, बाभळगाव, पूर्णा या आरोग्य केंद्रांतर्गत सेवेच्या 13 रुग्णवाहिका धावतात. कोणत्याही ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास यांना पाचारण केले जाते.

12 महिन्यांत 134 मातांची रुग्णवाहिकेत प्रसूती 

108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात प्रसूतीकरिता घेऊन जाताना 4 हजार 643 पैकी 134 गरोदर मातांनी बाळांना रुग्णवाहिकेतच जन्म दिला आहे.

एएलएसच्या 4 तर बीएलएसच्या 9 रुग्णवाहिका ः पूर्वी गरोदर मातांना 102 सुविधा उपलब्ध होती. नोव्हेंबर महिन्यात या सुविधेत बदल झाला. आता गरोदर मातांना डायल 108 सुविधेचा लाभ मिळणार आहे. 13 रुग्णवाहिकात 4 एएलएस तर 9 बीएलएस आहेत. एएलएस रुग्णवाहिकेत अत्याधुनिक यंत्रसामग्री असून शॉक देण्याची यंत्रणा तसेच व्हेंटीलेटर उपलब्ध आहे. बीएलएस रुग्णवाहिकेत सर्व यंत्रसामग्री असून मात्र व्हेंटीलेटर नाही. या रुग्णावाहिकामध्ये एक इमर्जन्सी असिस्टंट अर्थात चालक तर एक इमर्जन्सी डॉक्टर उपलब्ध असतात.