Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Marathwada › बीड : दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

बीड : दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

Published On: Dec 14 2017 10:03AM | Last Updated: Dec 14 2017 10:03AM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

अंबाजोगाई  येथील वरवटी गावाजवळ दोन बसची समोरासमोर धडक झाली. आज सकाळी झालेल्या अपघातात एका बसचा चालकाचा मृत्यू झाला तर ३० पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले. जखमीमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की,‘गंगाखेड-पुणे आणि लातूर-परभणी या दोन बसची वरवटी गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात लातूर-परभणी एसटी बसचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.’