Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Konkan › गुरूजींचे जीवघेणे धडे : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला 'गळती’

गुरूजींच्या धड्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला 'गळती’

Published On: Jul 14 2018 2:05PM | Last Updated: Jul 14 2018 3:21PMमनोर : संदीप जाधव

पालघर  जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार हा पालघरमधील जनतेला काही नवीन नाही. आता या पालघरमधील जिल्हा परिषद शिक्षण व विभागाने एक नवीन प्रताप केला आहे. 

बोईसर नवापूर नाक्याजवळ असलेल्या गुजराती जिल्हा परिषद शाळेने  छतावरील सरकलेली कौले नीट करण्यासाठी चक्क चिमुकल्या विद्यार्थ्यांना छतावर चढवून या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला आहे. सध्या पाऊस सुरु आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेत पाणी गळती होत आहे, मात्र यावर उपाय म्हणून पावसाआधी शाळांची डागडुजी करणे अपेक्षित असताना या शाळेला आता शहानपण सूचले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना कोणत्याही सुरक्षेशिवाय छतावर चढविले. याबाबतीत काढलेली छायाचित्रे व व्‍हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल झाला असून पालकांकडून या बाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

 जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाल यांचे शाळांकड़े दुर्लक्ष असल्याचे हे पहिलच उदाहरण नाही तर, या आधी सहा चाकी स्कूल बस पाच टायरवर धावत असल्याच समोरआल्या नंतरही या महाशयांनी थातुर मातुर कारवाई केल्याच समोर आल आहे.