Sat, Jul 20, 2019 08:45होमपेज › Konkan › दाभोळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दाभोळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:40PM

बुकमार्क करा

देवरूख :वार्ताहर

विजापूर येथील तरूणाने काम करत असलेल्या संगमेश्‍वर तालुक्यातील दाभोळे येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. 

दिगंबर हेमू राठोड (वय 22 वर्षे, रा. निगंदळे, ता. मुद्देबिया, जि. विजापूर, कर्नाटक) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दिगंबर हा दाभोळे येथील विश्‍वजीत काँक्रीट प्रॉडक्टमध्ये कामाला होता. त्याने शनिवारी रात्री टेस्टिंग मशीनच्या चौकटीला ओढणीने गळफास लावून घेतला. पहाटे उठल्यानंतर सहकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आली. याबाबत वैभव गुरव यांनी साखरपा दूरक्षेत्रात फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र समजून आलेले नाही. अधिक तपास हेड काँन्स्टेबल वाघाटे करीत आहेत.