होमपेज › Konkan › धोपावेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धोपावेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: May 30 2019 1:34AM | Last Updated: May 30 2019 1:34AM
शृंगारतळी : वार्ताहर

धोपावे गणेशवाडी येथे राहणारा तरुण समाधान संतोष नाटेकर (वय 19) याचा मृतदेह धोपावे तेलीवाडी नजीकच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा भाऊ चैतन्य संतोष नाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

याबाबत गुहागर पोलिसांत समाधानचा भाऊ चैतन्य नाटेकर याने जबाब दिला असून, त्याच्या म्हणण्यानुसार, धोपावे येथे राहणारी त्याची आई संकिता संतोष नाटेकर हिने आपला मुलगा समाधान गेले काही दिवस घरी येत नाही. तो बाहेर राहतो असे कळविले. त्यानुसार चैतन्य आपली पत्नी सुनीता हिला घेऊन दि.29 मे रोजी धोपावे येथे आला असता आपल्या भावाची चौकशी सुरू केली. गावातील काही जणांना घेऊन चैतन्य हा आपला भाऊ समाधान नाटेकर याचा शोध घेत असताना धोपावे तेलीवाडीकडील असलेल्या जंगलात सकाळी 10 वा. च्या सुमारास एका काजूच्या फांदीला गळफास लावून घेतलेला दिसला. म्हणून तत्काळ त्यांनी गळफास सोडवून तो बेशुद्ध असेल म्हणून ग्रामीण रूग्णालय गुहागर येथे औषधोपचारासाठी आणले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. 

समाधानचा भाऊ चैतन्य याने दिलेल्या जबाबानुसार गुहागर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान  शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास ए.एस.आय पवार करीत आहेत.