होमपेज › Konkan › मासे पकडताना नदीत बुडून तरूणाचा मृत्‍यू 

मासे पकडताना नदीत बुडून तरूणाचा मृत्‍यू 

Published On: May 16 2018 12:59PM | Last Updated: May 16 2018 12:59PMआंबोली (जि. सिंधुदुर्ग) : प्रतिनिधी

चौकुळ मळववाडी घटप्रभा नदी पापडी पुल येथे वडील आणि मित्रांसोबत मासे पकडायला गेलेल्‍या तरूणाचा बुडून मृत्‍यू झाला आहे.  साई शंकर गावडे (वय, वय १८ रा. गावडेआळी,चौकुळ) ) असे बुडून मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, साई १२ वी ची परीक्षा संपल्‍यानंतर सुट्टी निमित्त कोल्हापूरहुन आपल्या गावी चौकुळ येथे ला होता. वडील शंकर गावडे, चुलत भाऊ रूपेश गावडे व सोनू गावडे यांच्यासोबत माशे पकडायला चौकुळ मळववाडी येथील घटप्रभा नदीतील पापडी पुललाजवळ गेला होता. सर्व जण मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले होते,  काही वेळाने साईला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, अंधार असल्याने तो नेमका पाण्यात कोठे बुडाला समजले नाही. नातेवाईकांसह स्‍थानिकांनी त्‍याची सोधा शोध केली मात्र, त्‍याचा पत्‍ता लागला नाही. 

दरम्‍यान, आज (बुधवार १६ मे) सकाळी साई याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सकाळी पावणे आठ वाजता साईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन साठी आणण्यात आला. या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी आंबोली पोलिसांना दिली असून, या घटनेचा पुढील तपास आंबोली  पोलिस करत आहेत.