Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Konkan › काँक्रीट मिक्सरमध्ये चिरडून कामगार ठार

काँक्रीट मिक्सरमध्ये चिरडून कामगार ठार

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:33PM     
बांदा : प्रतिनिधी

आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाका बांधकामावरील काँक्रीट मिक्सर साफ करताना अचानक मिक्सर सुरू झाल्याने ब्लेडमध्ये सापडून प्रकाश अंताराम कुंभरे (वय 47, रा. गोंदिया) हा कामगार ठार झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी प्रकाश कुंभरे याच्या पुतण्याने सकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार बांदा पोलिसांनी मिक्सर ऑपरेटर विजय रामभाऊ सपकाळ (25, रा. चारथाना ता. मुक्‍ताईनगर, जळगाव) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतलेे.

बांदा-सटमटवाडी येथे सुमारे 32 एकर क्षेत्रात आरटीओ सीमा तपासणी नाका उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी सकाळी 8 वा.च्या सुमारास  प्रकाश कुंभरे व त्याचा सहकारी काँक्रीट मिक्सर साफ करत होते. मिक्सर साफ करण्यासाठी प्रकाश हा  मिक्सरमध्ये उतरला होता. तर त्याचा सहकारी खाली थांबला होता. मिक्सर ऑपरेटर विजय याने मिक्सर सुरू करण्यापूर्वी अलार्म वाजवला. मात्र, प्रकाश याला तो ऐकू न आल्याने तो आतमध्येच राहिला.