Thu, Nov 15, 2018 15:53होमपेज › Konkan › बसणी येथे महिलेची विहिरीत आत्महत्या

बसणी येथे महिलेची विहिरीत आत्महत्या

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 10:30PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील बसणी येथील एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. रंजिता यशवंत धांगडे (वय 55) असे या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेच्या दिव्यांग मुलाचा महिनाभरापूर्वीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा रंजिता धांगडे यांच्या मनावर परिणाम झाला होता. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे. दरम्यान, या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.