Mon, Mar 25, 2019 13:39होमपेज › Konkan › सहा महिलांकडून विवाहितेचा खून

सहा महिलांकडून विवाहितेचा खून

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:31PMमंडणगड : प्रतिनिधी

प्रेमसंबधांचा संशय आल्याने दहींबे येथील आदिवासी जमातीतील रेखा लक्ष्मण मुकना (वय 43) या प्रौढ महिलेला सहाजणींनी मिळून ठार मारले आहे. ही घटना 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात मृत महिलेची मुलगी निशा नितीन मोरे (29, रा. दहींबे आदिवासीवाडी) हिने मंडणगड पोलिस ठाण्यात दि.23 मे रोजी दुपारी फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील मृत महिला व शांताराम रावजी जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज करून वाडीतीलच संगीता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चंद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव, भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहींबे आदीवासीवाडी) या सहा महिलांनी  मिळून 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेखा मुकना हिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यातील संगीता शांताराम जाधव हिने काठीने मारहाण करून रेखा हिच्यावर दगड फेकून मारले. सहाजणींनी केलेल्या मारहाणीत रेखा हिचा मृत्यू झाला आहे. 

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.