Fri, Jan 24, 2020 22:50होमपेज › Konkan › शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावू : शरद पवार

शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावू : शरद पवार

Published On: Oct 30 2018 1:30AM | Last Updated: Oct 29 2018 8:54PMसावर्डे : वार्ताहर

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चिपळूण येथील कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या पवार यांची प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विकास नलावडे व शिक्षकांनी भेट घेतली. शिक्षकांच्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करू व ते सोडवू, असे आश्‍वासन पवार यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.

संच मान्यतेनुसार जादा शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून संघटना स्तरावर आमचा विरोध राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समानीकरण तत्त्वाने करण्याबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी पवार यांच्याकडे करण्यात आली. 

प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षांनी मला यापूर्वी निवेदन दिले असून याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्‍वासन पवार यांनी शिक्षकांना दिले. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विकास नलावडे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस राजेश चव्हाण, चिपळूण तालुका उपाध्यक्ष अरविंद भंडारी, सतीश सावर्डेकर, आनंदा गुजर आदी शिक्षक उपस्थित होते.