Mon, May 27, 2019 07:39होमपेज › Konkan › आपत्ती व्यवस्थापनाविरोधात संताप

आपत्ती व्यवस्थापनाविरोधात संताप

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:16PMविरण/श्रावण : वार्ताहर 

गोठणे ग्रा.पं.च्या माजी सदस्या सौ. सुजाता दशरथ आचरेकर यांची ती मुले होत. वडील दशरथ हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या कुटुंबातील मोठी मुलगी सुवर्णा ही पदवीनंतर मुंबईत नोकरी करत होती. भाऊ आकाश याने दहावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. तर दीपाली ही कणकवली कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिन्ही भावंडे चुलत बहिणीसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती, मात्र, मासेमारीसाठी वापरली जाणारी ती फायबर बोट पाहिल्यानंतर त्यांना बोटिंगचा मोह झाल्याने ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेशी संपर्क साधला. मात्र, कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.   

या दुर्घटनेची माहिती गोविंद आचरेकर यांनी बेळणे पोलिस दूरक्षेत्राला दिली. े हेडकॉस्टेबल डि.एस. सावंत, पी.आर. सावंत आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचले. गोठणे किर्लोस,रामगड येथील ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात आकाशचा शोध सुरू होता.  रामगड येथील संतोष पारकर व विष्णू कोळंबकर यांनी डोहात खोलवर जावून शोध घेतला असता दीड तासानंतर आकाशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा पोलिसठाण्याचे एपीआय संजय धुमाळे पथकासह दाखल झाले. कणकवलीतून पिंट्या जाधव यांची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी हिवाळे प्रा.आ. केंद्रात नेण्यात आले.