Sun, Mar 24, 2019 12:39होमपेज › Konkan › वेंगुर्ले तालुक्यामध्ये ८१ तर देवगडात ७४ टक्के मतदान

वेंगुर्ले तालुक्यामध्ये ८१ तर देवगडात ७४ टक्के मतदान

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:37PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले ः प्रतिनिधी 

वेंगुर्ले तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरासरी 81.10 टक्के मतदान झाले. सर्वच ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये पेंडूर ग्रामपंचायतीसाठी सर्वात जास्त 92.18 एवढे तर, देवगड तालुक्यात 74.22 टक्के मतदान झाले.

बुधवारी सकाळी 10 वा. वेंगुर्ले तहसील कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ होणार असून, मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड, पेंडूर, वायंगणी व खानोली या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 26 रोजी शांततेत पार पडली. थेट सरपंच निवडीत गाव पॅनेल व सर्वच राजकीय पक्षाने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे बर्‍याच लढती अटीतटीच्या अपेक्षित आहेत. वायंगणी  सरपंचपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात असून ही लढत लक्षवेधी आहे.  

मातोंड, पेंडूर व खानोली या ग्रामपंचायतींवर  महिलाराज येणार असल्याने या लढतीही तेवढ्याच रंगतदार ठरणार आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी झालेली बंडखोरी पक्षास हानिकारक ठरू शकते. यामध्ये मातोंड ग्रा. पं. साठी 79.47 टक्के मतदान झाले. यामध्ये प्रभाग एकमध्ये 70.74 टक्के तर प्रभाग दोनमध्ये 85.88 टक्के तर प्रभाग तीनमध्ये 84.10 टक्के एवढे मतदान झाले. पेंडूर ग्रामपंचायतीसाठी 92.18 टक्के मतदान झाले. प्रभाग एक मध्ये 90.80 टक्के, प्रभाग दोनमध्ये 94.19 टक्के तर प्रभाग तीनमध्ये 91.58 एवढे मतदान झाले. खानोली ग्रा.पं.साठी 76.40एवढे मतदान झाले. यामध्ये प्रभाग एक 77.31 टक्के, प्रभाग दोन मध्ये 73.36 तर प्रभाग तीन मध्ये 77.74 टक्के एवढे मतदान झाले. वायंगणी ग्रा.पं. साठी 76.78 मतदान झाले.  यामध्ये प्रभाग एकमध्ये 69.29, प्रभाग दोन मध्ये82.13 टक्के तर प्रभाग तीनमध्ये 80.74 एवढे मतदान झाले. बुधवारी सकाळी 10 वा. तहसील कार्यालयात चार टेबलवर मतमोजणी होणार असून, एक ते दीड तासात निकाल अपेक्षित आहे.