Mon, Aug 19, 2019 09:28होमपेज › Konkan › कृषि महोत्सवात वेंगुर्ले तालुक्याचा सक्रिय सहभाग असावा : देसाई

कृषि महोत्सवात वेंगुर्ले तालुक्याचा सक्रिय सहभाग असावा : देसाई

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 13 2017 1:56AM

बुकमार्क करा

वेंगुर्ले ः शहर वार्ताहर

सिंधुदुर्ग जि. प. कृषी व पशुसंवर्धन समिती आयोजित पशुपक्षी मेळावा व कृषी महोत्सव 22 ते 26 डिसें या कालावधीत कुडाळ येथे साजरा होणार आहे. या महोत्सवात वेंगुर्ले तालुक्याच्या सक्रिय सहभागासाठी तालुक्यातील शेतकर, बचत गट, पशु पालक यांना आमंत्रित करावे, असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले. जि. प. कृषि महोत्सव निायोजन आढावा बैठक वेंगुर्ले पंचायत समितीच्या  बॅ नाथ पै सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे आदी उपस्थित होते. 

 रणजित देसाई म्हणाले, गेल्या वर्षी जि. प. ने  आयोजित केलेल्या कृषी व पशुमेळाव्याला जिल्हावासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावर्षी त्याच धर्तीवर कृषी व पशुमेळाव्याचे आयोजन केले आहे.गेली तीन वर्ष  हा मेळावा जिल्ह्यात आयोजित केला जात आहे. या  मेळाव्यासाठी वेंगुर्ले पंचायत समितीच्या कृषी व पशुसवर्धन विभागाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.  कृषी व पशुपालन मेळाव्यात    गोवा, बेळगाव, कोल्हापूर येथून येणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येच्या तुलनेत स्थानिक शेतकर्‍यांचा सहभाग खूपच कमी असतो. यासाठी स़्थानिक शेतकर्‍यांचा  सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.  मेळाव्यात आत्मा योजनेंतर्गत शेतकरी  अवजारे ,यंत्रे  मांडण्यात येणार आहेत.

22 डिसें रोजी मेळाव्याचे  उद्घाटन होणार असून, पहिल्या दिवशीचा  नियोजनाचा पहिला मान वेंगुर्ले तालुक्याला दिला जाणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी गावोगावी जनजागृती करण्यासाठी बॅनर लावावेत असे आवाहन केले. सभापती यशवंत परब यांनी वेंगुर्ले तालुक्याचे सहकार्य  देऊन हा मेळावा यशस्वी केरण्याचे  आश्‍वासन दिले.