Mon, Nov 19, 2018 07:17होमपेज › Konkan › लेखिका वीणा गवाणकर आजपासून सिंधुदुर्गात

लेखिका वीणा गवाणकर आजपासून सिंधुदुर्गात

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:50PM

बुकमार्क करा
पणदूर : वार्ताहर

जन्माने गुलाम असलेल्या अनाथ कृष्णवर्णिय अमेरिकन कृषी शास्त्रज्ञांच्या धडपडीची मानवी जीवनाचा मोल वाढविणार्‍या त्यांच्या प्रयत्नांचा वेध घेणारी चरित्र कहाणी 1981 साली ‘एका होता कार्व्हर’ या ना वाने लिहिणार्‍या आणि पुढे याच लेखनाची ठळक ओळख झालेल्या विख्यात लेखिका विणा गवाणकर या 5 जानेवारीपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. 5 ते 7 जानेवारी या कालावधीत संविता आश्रमच्या संदीप परब यांनी त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात खास निमंत्रित केले आहे.

शुक्रवार  5 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. गवाणकर अणाव वाचनालयाला भेट देणार आहेत. दुपारी पणदूर सविता आश्रमाला भेट देवून आश्रमाची माहिती घेतील. दु. 3.30 वा. कुडाळ एसआरएम महाविद्यालयात सविता आश्रमच्या वृध्दांसाठी आयोजित विद्यार्थ्यांच्या संगीत विषयक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवार 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. संत राऊळ महाराज महाविद्यालयात गवाणकर यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. संविता आश्रमात 4 वा. साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार  7 रोजी 10 वा. कुडाळ देशकर गौड ब्राम्हण संघाच्या मुलांसाठी आयोजित वर्कशॉपचे उद्घाटन गवाणकर यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संदीप परब यांनी दिली.