Tue, Nov 13, 2018 00:37होमपेज › Konkan › आश्‍वासनाअंती वैभववाडीत तिघांचे उपोषण स्थगित

आश्‍वासनाअंती वैभववाडीत तिघांचे उपोषण स्थगित

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:13PMवैभववाडी ः प्रतिनिधी 
प्रजासत्ताकदिनी वैभववाडीत तहसिल कार्यालयासमोर तीन उपोषण करण्यात आली. ही तिन्ही उपोषणे रात्री उशिरा आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आली. यामध्ये अंजली रावराणे,अनीता करकोटे व उदय जैतापकर यांचा उपोषणात समावेश होता.

     एडगाव येथील अगस्ती रावराणे यांच्या घरात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. या चोरीचा तपास करण्यात पोलिस विलंब करीत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी  त्यांनी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.वैभववाडी पोलिसांनी चोरीचा तपास लवकरात लवकर करण्यात  येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर  त्यांनी उपोषण मागे घेतले. येत्या 1 मे पूर्वी याचा तपास लागला नाही.  तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नापणे येथील उदय जैतापकर यांनी माहितीचा अधिकारात मागविलेली माहिती कृषी विभागा देण्यास टाळाटाळ करत असल्याने कृषी विभागाच्या विरोधात उपोषण केले. कृषी विभागाने माहिती देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. न.पं.मध्ये अनुकंपाखाली मयत वडिलांच्या जागी आपल्या मुलाला कामावर हजर करुन घेण्यात यावे. यासाठी  अनिता करकोटे यांनी उपोषण केले. मुख्याधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर त्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा उपोषण मागे घेतले.