Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Konkan › उसप सरपंचावरील कारवाईवरून सेना- भाजप सदस्यांत वादळी चर्चा

उसप सरपंचावरील कारवाईवरून सेना- भाजप सदस्यांत वादळी चर्चा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:37PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील उसप ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आर्थिक अपहार केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा, अशी मागणी स्थायी समिती सभागृहात  सदस्य संजय पडते यांनी केली. तर त्या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी त्या सरपंचानी हा निधी खर्च केल्याचे सांगत राजेंद्र म्हापसेकर यांनी बाजू घेण्याचा प्रयत्न केला. या विषयावर मात्र सेना आणि भाजप सदस्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली ! अखेर सरपंचांनी अपहार केला असेल तर त्याची गय नको, तो मग कोणत्याही पक्षाचा असो असे सुनावत सतीश सावंत यांनी हा वाद थांबविला! 

जि. प. स्थायी समितीची सभा सोमवारी जि. प.अध्यक्षा सौ रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली   झाली.  उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, सायली सावंत,  शारदा कांबळे, सदस्य सतीश सावंत , संजय पडते, अमरसेन सावंत, दादा कुबल ,अंकुश जाधव, संजना सावंत, राजेंद्र म्हापसेकर, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, आदि खातेप्रमुख उपस्थित होते. 

उपस सरपंचांनी आर्थिक अपहार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या सरपंचांवर कारवाई करा, असे आदेश दिले. मात्र गटविकास अधिकर्‍यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना पाठीशी घातले असा आरोप करत सदस्य संजय पडते यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्या सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याची  मागणी केली. या विषयात राजेंद्र म्हापसेकर यांनी तोंड घातले. गावातील पिण्याच्या पाण्यासाठी त्या सरपंचांनी हा निधी वापरले असल्याचे सांगत सखोल चौकशी करत कारवाई करा अशी भूमिका घेत त्या सरपंचांची बाजू  सावरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सेना आणि भाजप सदस्यांमध्ये या विषयावरुन चांगलीच जुंपली होती. सदस्य अंकुश जाधव यांनी कुडाळ ग्रामपंचायती मधील तत्कालीन प्रेशर कुकर घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करत मर्मिकतेनेही लक्ष वेधले. कारवाईचे ते पत्र गुन्हे दाखल करण्याचे नव्हते तर प्रशासकीय कारवाई करण्याचे होते. याकडे रणजीत देसाई यांनी लक्ष वेधले. मात्र आर्थिक अपहार करणार्‍या कोणत्याही सरपंचाची अथवा ग्रामसेवकाची गय करू नका, चौकशी मध्ये आर्थिक अपहार झाल्याचे समोर आले तर तात्काळ कारवाई करा. मग सरपंच कोणत्याही पक्षाचा असो असे सूचित करत सदस्य सतीश सावंत यांनी या वादळी विषयावरील चर्चा थांबविली. 

जीएसटी आणि दर सूचीतील बदल यामुळे जि. प. बांधकाम कडील प्रशासकीय मंजूर झालेली 91 विकास कामे तांत्रिक अडचणीत सापडली आहेत. अंदाजपत्रकातील रक्कमेप्रमाणे पूर्ण निधी या कामांवर खर्च न होता अखर्चित राहणार आहे. शिल्लक निधी रस्त्यांची लांबी वाढवून व अन्य विकास कामांमध्ये घटक वाढवून सर्वच्या सर्व निधी खर्च व्हाव यासाठी सतीश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली. बांधकामाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, वित्त अधिकारी महेश कारंडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नावर मार्ग काढावा. या तांत्रिक अडचणीत निधीची बचत करण्या अभावी रस्त्यांची लांबी वाढवून मंजूर असलेला सर्वच्या सर्व निधी खर्च करावा, असे सांगत अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी  या वादावर पडदा टाकला.

माकड तापाबाबत जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी दोडामार्ग तालुक्यातील पंतुर्ली व आडाळी येथे 3 रुग्ण नव्याने आढळल्याची माहिती दिली. आंब्रड मध्ये जी मृत माकडे आढळली ती अन्न विष बाधेतून मृत्यु झाल्याचा अंदाज असल्याची माहिती दिली. 

राजेंद्र म्हापसेकर यांनी जेनेरिक औषधांचा पुरवठा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून करावा अशी सूचना केली तर महिलांसाठी कुक्कुट पालन आणि दुधाळ जनावरांची योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने तयार करून तो प्रस्ताव जिल्हा नियामक मंडळाच्या बैठकीत ठेवावा, अशी सूचना सतीश सावंत यानी केली.