Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : साळच्या ‘गडय़ांचे गूढ’!

सिंधुदुर्ग : साळच्या ‘गडय़ांचे गूढ’!

Published On: Mar 04 2018 11:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:44AMकुडाळ: राजाराम परब


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरालगतच्या साळ (गोवा) या सीमावर्ती भागातील गावातल्या गडे उत्सवाचे गूढ व उत्सुकता आजही बदलत्या जमान्यात अगदी जैसे थे आहे. दोडामार्गालगत अवघ्या चार कि. मी. वर वसलेले ‘साळ’ हे गाव गोवा राज्याच्या हद्दीत येत असले तरी त्याची नाळ जणू दोडामार्गशी कित्येक वर्षे जोडली गेली आहे. नदीकाठालगत वसलेले व शेती बागायती सोबत आर्थिकदृष्ट्या सुजलाम- सुफलाम म्हणुन या साळ ची वेगळी ओळख आहे. या गावामध्ये श्री महादेव, श्री देवी भूमिका पंचायतन ही देवस्थाने पुरातन आहेत. याच भागातले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडे उत्सव.. साळ मधील या गडे उत्सवाला चारशे- साडेचारशे वर्षाची परंपरा आहे.


या उत्सवाला सुरूवात होते ती होळी पोर्णिमेच्या दुस-या दिवशी मध्यरात्री १२ वाजता! मग रात्रभर, पहाटे पाचपर्यंत हा उत्सव चालतो. या उत्सवादरम्यान गावातील रहिवाशांपैकी ६४ तर कधी ४० व्यक्तींवर संचार येतो. हे ६४ किंवा ४० मानकरी म्हणजेच गडे. त्यांचा पेहराव नेहमीचाच. धोतर, कमरेला पट्टा आणि बनियन असा.. मध्यरात्री सर्व गड्यांना देवीचे तीर्थ दिल्यानंतर हे गडे नजीकच्या जंगलाकडे एकापाठोपाठ जाऊ लागतात. प्रथा अशी आहे की, ढोलकी वाजू लागते.


पहिला गडा या वाजंत्र्याच्या हाताला पकडून डोंगराच्या उंच टेकडीवर धावू लागतो. आवाजाचा वेध सर्वानाच घेता येतो. पहिल्या रात्री करूले पकडण्याचा कार्यक्रम असतो. करूले म्हणजे स्मशानात उत्तरकार्यासाठी वापरतात तेवढया आकाराचे मातीचे भांडे! मात्र हे करूलेही पळत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. देवचार म्हणजे देव नव्हे. एखाद्या क्षेत्राचा किंवा संबधित जागा- परीसराचा राखणदार म्हणजेच देवचार. हे गडे जंगलात जाऊन रात्रीच्या अंधारात हे करूले जमा करत असताना एक किंवा दोन गडे ‘देवचार लपवून ठेवतो’ अशी श्रद्धा आहे, आणि भावनाही. त्या दरम्यान भाविकांना देवचाराने दर्शन द्यावे, यासाठी आगीची चूड दाखवली जाते. ही चूड उलटसुलट फिरवत फे कली जाते. त्यामूळे एका चुडीबरोबर तीन – चार चुडी पळताना दिसतात. हे दृश्य चित्तथरारक असेच! ते पाहण्यासाठी हजारो भाविक साळमध्ये दर शिमगोत्सवात येत असतात.


दुस-या दिवशी हे गडे रात्री १२ वाजता ठरलेल्या होळीकडे येतात. देवीचे पुन्हा एकदा तीर्थ घेतल्यानंतर पहिल्या रात्री ललपवलेल्या गडयांना आणण्यासाठी हे सगळे गडे जंगलात जातात. त्यांना नेण्यासाठी देवचार ह्यअदृश्य रूपाने होळीकडे येतो, असे मानले जाते. त्यांना घेऊन गेल्यानंतर उंच टेकडीवर पवलेल्या अगोदरच्या गडयांना देवचार या गडयांकडे सुपुर्द करतो. मात्र लपवून ठेवलेला गडे पूर्णपणे बेशुद्धावस्थेत असतात. त्यांना चार गडे आपल्या खांद्यावरून होळीकडे आणतात. येथे त्यांना भूमिका देवीचे तीर्थ दिले जाते. त्याला शुद्धीत आणण्याची परंपरा ही वेगळी आहे. दोन गडे हातात हात घालून होळीभोवती फे-या मारतात. हळुहळु शुद्धीवर आलेल्या त्या गडयांवरही संचार येतो. आणि उंच उडी मारून तो ही नाचू लागतो. बाकीच्या गडयांना घेऊन लपवून ठेवलेल्या गडयांच्या शोधार्थ सर्वजण पून्हा रवाना होतात. तेथे झाडावर लपवून ठेवलेल्या गडयालाही अन्य गडयांच्या सुपूर्द केले जाते. या दरम्यान देवचार व गडयांमध्ये रस्सीखेचही होते असे सांगितले जाते. 

गडा दिल्यानंतर त्या जागी मोठी मशाल पेटते. अशा तीनचार मशालींचे दृश्य दिसू लागते .हे दृश्य पाहण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या – झुंडी अक्षरश: धावत पळत असतात.तिस-या दिवशी म्हणजेच अंतिम रात्री हे सर्व गडे स्मशानात जातात. हा मार्ग लोकवस्तीतून जात असल्याने सर्वजण घराचे दरवाजे बंद करतात. गडे सरणावरील लाकडे, मडकी, पांढरे कापड व अन्य वस्तू होळीकडे आणतात. मात्र या वस्तू गडयांना देण्यास मशाणातील आत्मे नाखूष असतात म्हणुन गडे या वस्तू नेत असताना मोठयाने चित्र विचित्र आवाज येवू लागतात असे जाणकार सांगतात. या तिन्ही दिवशी ढोलताशे यांचा गजर आणि नमनाचा कार्यक्रम सुरु असतो.

या नमनात गोव्यापासून सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतील सर्व देवांचे काव्यातून नामस्मरण करून त्यानाही उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली जाते.विशेष म्हणजे होळीत होणा-या या उत्सवाच्या तिन्ही रात्री सर्व गडे अनवाणी गावाच्या सीमेवर, जंगलभर फि रत असतात. गडयांची वये १६ वर्षापासून ६० वर्षापर्यंत .. पण ह्यसंचार आल्यावर एखादया वृद्ध गडाही तरूणासारखा धावू लागतो. हा गडा नसलेल्यांना या तीन दिवसांत मध्यरात्री बारानंतर गावाच्या सीमेबाहेर जाता येत नाही.तसे सीमे बाहेर कोणी जाऊ नये असा रिवाज आहे. या बद्दल अनेकवेळा सांगितले जात होते.. पण अनेकांना काही खरे वाटले नव्हते  ह्यामधील बरेच प्रंसग अनेकानस्वतः बघीतले आहेत हातात मशाल घेतलेला व्यक्ती (देवचार) एका क्षणात डोंगरात तर क्षणात आपल्या जवळ पण येते.. पण कीतीही जवळ गेलात तरी त्याचा चेहरा दीसत नाही फक्त दिसते एक अंधुक आकृती.

 
 गडे म्हणजे 
कंबरेला चामडयाचा काळा पट्टा, पायघोळ, पांढरे धोतर अशा पेहरावात असणा-या व्यक्ती. पहिल्यांदा रोंबाट घातले गेले. मन झाले आणि मग गडयांचा थरारक उत्सव सुरू झाला.?होळीला पाच फेरे मारून गडे डोंगरावर असणा-या करवल्या आणण्यासाठी बाहेर पडले. होळीपासून डोंगरावर जाणारे गडे तुफान वेगात जाऊ लागतात.त्यांच्या अंगात एक वेगळीच शक्ती आलेली असते. त्यांच्या स्वागतासाठी मध्ये-मध्ये मशाली पेटतात. या मशाली कशा पेटतात, कोण पेटवतो याबाबत मतमतांतरे आहेत.
गडयांना आणणे म्हणजे एक दिव्य काम असते. हजारो भाविक गडयांच्या पाठोपाठ धावत असतात. हा उत्सव रात्रीचा चालतो. सूर्योदय होताच चित्र?बदलते.?हजारो माणसे धावत असलेल्या मळलेल्या वाटेवरच्या पाऊलखुणाही गायब झालेल्या असतात. या उत्सवाचा थरारपहिल्या चार दिवसांत अनुभवायला आला.

ज्यांना पटत नसेल त्यांनी एकदा जाऊन नक्की बघा.